निधन वार्ता ! करंजेपुल येथील जयराम लकडे यांचे निधन
सोमेश्वरनगर - करंजेपुल (ता बारामती) येथील जयराम भिवा लकडे यांच गुरुवार दि.२८ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते. जयराम लकडे यांनी आपल्या कारकिर्दीत करंजे ग्रामीण पतसंस्था विद्यमान संचालक म्हणून कार्यरत ,श्री सोमेश्वर साखर कारखाना शेतकी विभागात (चीट बॉय) सेवानिवृत्त, करंजेपूल ग्रामपंचायत सदस्य म्हणून पद भूषवले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी सविता,दोन विवाहित मुले नात नातवंडे असा परिवार आहे सध्या आर्मी मध्ये कार्यरत असणारे रणजीत लकडे तसेच नुकतेच आर्मी सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले विक्रम लकडे यांचे ते वडील होत.
अंत्यविधी आज गुरुवार रोजी रात्री 8 वाजता होईल.
ठिकाण - करंजेपुल स्मशानभूमी.



