(मुख्य संपादक विनोद गोलांडे)
बारामती- महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित बारामती तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये श्री.अमित गावडे तालुकाध्यक्षपदी तर सोमनाथ कोठावळे यांची तर तालुका सचिवपदी यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रगतीसाठी व शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडवणूकीसाठी या महासंघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यकारिणीची निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून तालुका निवड सभा नुकतीच पार पडली. सदर निवड प्रक्रिया पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मार्गदर्शक सचिन नाळे, पुणे जिल्हा सचिव रणजीत देवकर ,जिल्हा मार्गदर्शक सेवा जेष्ठ क्रीडा शिक्षिका साधना खोमणे व सेवा जेष्ठ क्रीडाशिक्षक धनंजय यादव, महासंघाचे संस्थापक संदीप मनोरे, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
बारामती तालुका अध्यक्ष अमित गावडे ,उपाध्यक्ष पदी अभिजीत चव्हाण, मंदार कळसकर व ज्योती उदावंत ,कार्याध्यक्ष पदी , मयूर जराड सचिव सोमनाथ कोठावळे सहसचिव , विशाल हंडबर, अमोल नाळे , किरण पवार खजिनदार, मोहन कचरे सहखजिनदारपदी , ऋषिकेश लोणकर ,संगीता कोल्हे तालुका संघटक, शुभम पवार , दत्ता चव्हाण, जयदिप शिर्के , प्रशांत शेंडगे , अनुराग देशमुख , योगेश भोसले , स्वाती भापकर, कामिनी भोसले , रेखा धनगर यांची निवड झाली आहे. तसेच बारामती तालुका सदस्य हर्षद झिटे , मनोज मदने , आप्पा देवकाते , शुभम इंगवले,कु अंकिता धुमाळ , पुनम नाळे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या कार्यकारणींची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये बारामती तालुका कार्यकारणी नुकतीच पार पडली.
निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे तालुक्यातील क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.



