जेजुरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडी प्रमुखाचा सन्मान.
जेजुरी प्रतिनिधी -पुरंदर तालुक्यातील तिर्थक्षेत्र जेजुरी नगरीत आळंदी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मशाळा चे अध्यक्ष व दिंडी सोहळा प्रमुख जयवंतराव कवितके यांचा पारंपरिक घोंगडी, काठी व अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा देऊन सन्मान करण्यात आला
संत श्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर दिनांक ८ जुलै रोजी प्रस्थान करणार असून त्यासंदर्भात प्रत्येक ठिकाणच्या मुक्कामी असणाऱ्या जागांची पहाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडी क्रमांक ९१ चे दिंडी प्रमुख तथा अध्यक्ष जयवंतराव कवितके, संस्थेचे मार्गदर्शक दत्तात्रय भोजने, रमेश लेंडे, सचिव नवनाथ जारकड, दिंडी व्यवस्थापक विजय महाराज जगताप,सुरेश महाराज बारगळ, तुकाराम भोजने, हरीभाऊ एकळ, गजानन कवितके, सागर सोनावळे, राहुल लंबाते, रामदास गवते, मच्छिंद्र वारे चंद्रकांत ठोंबरे,मोहन गुंड आदिंनी केली जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या जागी अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिजामाता हायस्कूल चे प्राचार्य नंदकुमार सागर, प्राध्यापक सोमनाथ उबाळे सर, प्रल्हाद गिरमे सर, बाळासाहेब लेंडे, मयुरेश लेंडे आदि उपस्थित होते.



