Type Here to Get Search Results !

माळेगाव ....श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु.सज्ज.

माळेगाव ....श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु.सज्ज.
बारामती : श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे माळेगाव बु. नगरपंचायत शहरात १७ जुलै २०२६ रोजी आगमन होणार असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली आहे. 

पालखी सोहळा येणाऱ्या वारकऱ्यांसाठी नगरपरिषदेच्यावतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नगरपंचायत युद्धपातळीवर काम करत आहे. संपूर्ण पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे भरणे, रस्त्यांची स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व स्वच्छता आदी कामे करण्यात येत आहेत. शहरातील सर्व पथदिवे सुस्थितीत सुरू राहतील तसेच स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. शहरातील हातपंप दुरूस्त करून विंधन विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरु आहे. 

पालखी मार्गावरील स्वच्छतेचे काम नगरपंचायतीमार्फत सुरु असून १५ व १६ जुलै रोजी नगरपंचायत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बु. आणि पोलीस प्रशिक्षण अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियानाचे करण्यात येणार आहे. 

नगरपंचायत कार्यालयाशेजारी पालखी विसाव्याच्या ठिकाणी असलेले मंडप, सेल्फी पॉइन्ट, आदी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व दिंड्यांना टँकरने पाणी भरण्याकरिता जलशुद्धीकरण केंद्र, माळेगाव बु. नगरपंचायत याठिकाणी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नगरपंचायत मार्फत आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ X ७ कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच हेल्पलाईन क्र.०२११२-२५४००१ कार्यान्वित करण्यात आला आहे.

यंदाही ‘हरित वारी-सुरक्षित वारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून याअंर्तगत पालखी मार्गावरील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपंचायतीचे संपूर्ण पदाधिकारी,अधिकारी- कर्मचारी वर्ग पालखी नियोजनसाठी काम करीत आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत शिबीर आयोजित करण्यात येणार असून सर्व वारकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. प्लास्टिक मुक्त, तंबाखुमुक्त शहर ठेवण्यासाठी व सुरक्षित पालखी सोहळ्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test