Type Here to Get Search Results !

सोमेश्वर वाचनालयाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न .

सोमेश्वर वाचनालयाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न .

सोमेश्वरनगर - सोमेश्वर वाचनालयाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ११/७/२०२६ रोजी सकाळी ठीक ११.३० वा. सुरू झाली. सभेची सुरुवात कै.मा.श्री अजित अनंतराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सरस्वती च्या प्रतिमेला पुष्पहार घालून सभेचा प्रारंभ झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी मु.सा .काकडे महाविद्यालयाचे सचिव मा.श्री सतीश लकडे सर हे होते. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून मु.सा .काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे सर व सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद जगताप सर हे होते. तसेच सोमेश्वर वाचनालयाचे सर्व संचालक मंडळ व मु.सा. काकडे महाविद्यालयाचे सर्व आजीव सदस्य , सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व आजीव सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक वाचनालयाचे कोषाध्यक्ष प्रा .डॉ. संजू जाधव सर यांनी केले व त्यामध्ये वाचनालयाचा सन २०२१ ते सन २०२६ पर्यंतच्या केलेल्या विकास कामाचा आढावा सांगितला त्यात सोमेश्वर वाचनालयाची वेबसाईट सुरू करण्यात आली तसेच गोरगरीब, होतकरू मुलांना अभ्यासिका चालू करण्यात आली त्यासाठी लागणारे इंटरनेट सेवा (वायफाय) ,अभ्यासासाठी लागणारी सर्व भरती प्रक्रियेवरील पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जातात, पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, डॉक्टर्स, कामगार वर्ग , संशोधक, विद्यार्थी इतर वाचकांना वाचनालयात नियमित वाचनासाठी 16 वर्तमानपत्रे ,७२ विविध प्रकारची मासिके मोफत उपलब्ध करून दिली जातात. तसेच अल्प दरात सभासद करून त्यांना घरी वाचनासाठी पुस्तके दिली जातात. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये थोर समाज सुधारक, महापुरुष यांच्या जयंतीचे आयोजन केले जाते. तरी पंचक्रोशीतील सर्व वाचक व सभासद वर्गांना आव्हान करण्यात येते की, वाचनालयामध्ये दर्जेदार पुस्तके , दिवाळी अंक खरेदी केली जातात तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व येणाऱ्या वाचकांचे वाचनालयात स्वागत राहील.
वाचनालयाचे कार्यवाह मा.श्री उदयसिंह जगताप सर यांनी सन २०२४-२५ मधील सर्वसाधारण सभेच्या मागील बैठकीच्या वृत्तांताचे वाचन करण्यात आले त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली तसेच सन- २०२५-२६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनांचे व अजेंठया वरील सर्व विषयांचे तपशीलवार वाचन करून माहिती देण्यात आली . तसेच वाचनालयाचे अंतर्गत हिशोब तपासनिस प्रा.डॉ. अजय दरेकर सर यांनी वाचनालयाचा सन २०२५-२६ च्या ऑडिट रिपोर्टचे वाचन करून तपशीलवार जमाखर्चाची माहिती दिली त्याला उपस्थित सभागृहाने सर्वानुमते मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रा. श्री अनिल निगडे सर यांनी वाचनालयाचा सन -२०२६-२७ च्या अंदाजपत्रकाचे तपशीलवारपणे वाचन करून माहिती देण्यात आली त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
प्राचार्य मा. डॉ. देविदास वायदंडे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये वाचनालयाची सुरुवात सन - १९७९ मध्ये महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्य कै. सुशीलाताई आठवले यांनी केली. ते आजतागायत वाचनालय सुस्थितीत चालू आहे याचा मला आनंद आहे त्याचप्रमाणे सन २०२१ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संचालकांनी चांगली विकास कामे केली आहेत त्यामध्ये नवीन इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आर्थिक मदत तसेच वाचनालयातील फर्निचरची व्यवस्था केली विनामूल्य जागा दिली कारखान्याचे चेअरमन मा. श्री पुरुषोत्तम दादा जगताप यांनी स्थायी विकास निधी म्हणून ५१,००० /-रुपये देणगी दिली तसेच सर्व संचालक मंडळांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे सोमेश्वर वाचनालयातर्फे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे कै.अजित दादा पवार यांनी इमारतीचे उद्घाटन केले व इमारतीचे कौतुक केले होते त्यावेळी त्यांनी वाचनालयासाठी पुस्तक खरेदी करण्यासाठी ५०,०००/- रुपये देणगी दिली होती त्याबद्दल वाचनालय त्यांचे कायम शतशः ऋणी राहील . त्याचप्रमाणे मा. श्री सतीश लकडे सर सचिव मु.सा .काकडे महाविद्यालय व वाचनालयाचे संचालक मंडळ यांनी चेंज रिपोर्टचे काम पूर्ण केले व इतर विकास कामे चांगली केली आहेत त्यामुळे सर्व संचालकांचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, त्याचप्रमाणे काही सूचना करण्यात आल्या अभ्यासिकेमध्ये लाईटची व्यवस्था वाढवण्यात यावी, पुस्तकांची संख्येमध्ये वाढ करावी, तसेच प्रत्येक अजीव सदस्यांनी प्रत्येकी दोन पुस्तके वाचनालयास भेट द्यावीत असे सभागृहास आव्हान करण्यात आले त्यालाही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली तसेच प्रत्येक आजीव सदस्याचे सेवानिवृत्तीनंतर त्यांचे वाचनालयाने गुलाब पुष्प किंवा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करावा असे संबोधित केले. त्यास अनुमोदन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. जगन्नाथ साळवे व प्रा. डॉ. नारायण राजुरवार सर , प्रा.डॉ प्रवीण ताटे देशमुख सर यांनी दिले.
तसेच सर्वसाधारण सभेमध्ये वाचनालयाचे कोषाध्यक्ष प्रा.डॉ. संजू जाधव सर यांनी ५,०००/- रुपयेचा धनादेश वाचनालयासाठी प्राचार्य मा. प्रा .डॉ.देविदास वायदंडे सर यांच्या हस्ते सुपूर्त केला.
सभेचे अध्यक्ष मु.सा .काकडे महाविद्यालयाचे सचिव मा.श्री सतीश लकडे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये वाचनालयाचे चांगले काम व प्रामाणिक काम केल्याबद्दल कर्मचारी ग्रंथपाल श्री अजित जगताप सर व सौ जगताप मॅडम यांचा सत्कार करण्यात आला व असेच प्रामाणिक काम करत रहा असा संदेश दिला तुमच्या पाठीशी सर्व आजीव सदस्य राहतील त्याचप्रमाणे सर्व संचालकांनी आजपर्यंत चांगल्या प्रकारची कामे केली आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानले. 
सन -२०२१ ते सन -२०२६ च्या सर्व आजीव सदस्यांचा निरोप समारंभ सत्कार घेण्यात आले व नवनिर्वाचित संचालकांची सभेमध्ये बिनविरोध नावे घोषित करण्यात आली त्याला सर्व सभागृहांनी एक मताने मंजुरी देण्यात आली व त्यानंतर त्यांचेही अभिनंदन करून सत्कार करण्यात आले .
ग्रंथपाल श्री अजित जगताप यांनी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते . तसेच त्यांनी सर्व संचालकांचे चांगले सहकार्य व सहवास लाभल्यामुळे मनापासून सर्वांचे आभार मानले.
सभेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष श्री कल्याण जगताप सर , अं.ही. तपासणीस श्री अनिल भोसले सर व श्री प्रवीण काळे सर, मा.प्राचार्य श्री पद्माकर जगताप सर, प्रा. डॉ. जवाहर चौधरी सर, सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री राजेंद्र यादवसाहेब यां सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल वाचनालय आपले कायम ऋणी राहील . सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन वाचनालयाचे उपकार्यवाह प्रा. रवींद्र होळकर सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन तपशीलवारपणे मांडणी केली तसेच
प्रा.डॉ.अजय दरेकर सर यांनी सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर व आजीव सदस्यांचे आभार मानले व शेवटी सर्वांना अल्पोपहार व चहापान करून सर्वसाधारण सभेची सांगता खेळीमेळीत संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test