बारामती प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र काटेवाडी मार्फत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा चे औचित्य साधून सहभागी वारकरी यांचा आवश्यक औषधाचे किट देऊन वारकरी यांचे आरोग्याची काळजी घेण्याची नाविण्यपूर्ण योजना राबविण्याचा संकल्प प्रा. आ. केंद्र काटेवाडीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वैशाली देवकात व डॉ. बापू दडस यांनी केला व या संकल्पास मा. उपमुख्यमंत्री श्रीम. सुनेत्राताई पवार यांनी सहमती दर्शविले व मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते वारकरी दिडी प्रमुखांना औषध किट चे वाटप केले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटविकास अधिकारी. किशोर माने, तालुका विस्तार अधिकारी श्री. सूनिल जगताप काटेवाडीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच दिंडीतील एका वारकरीस औषधाचे प्रशिक्षण डॉ. दडस यांनी दिले.
पालखीनिमित्त वारकरी यांचेकरीता ओपीडी तपासणी करुन जवळपास ९०० पेक्षा जास्त वारकरी यांना औषधोपचार दिले तसेच १६ वारकरी यांना आंतररुग्णात दाखल करुन उपचार दिले.



