श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
पुणे व बारामतीच्या मध्यावर म्हणजेच पुणेपासून ७० किमी पूर्व व ३५ किमी पच्छिम बाजूस चिंचेच्या वनात वसलेले श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर म्हणजेच सोमयाचे करंजे. पर्यंटन क्षेत्राचा बी दर्जा मिळालेले हे तिर्थक्षेत्र विविध सुविधांनी युक्त झाले असून सुमारे साडेचार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. भाविनकांच्यासाठी निवास व्यवस्था, मंगलकार्यालय, पूजा साहित्याचीसाठी प्रशस्थ दुकाने अंतर्गत रस्ते, वाहनतळ वगैरे झाले आहेत. हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे दवपारयुगातील मंदिर चिंचेच्या वनात समुद्रसपाटी पासून अठराशे फुट उंचीवर असणारे एकमेव महादेवाचे मंदिर आहे.
श्री सोमेश्वराचे ऐतिहासिक महात्म्य
एके काळी करंजे नावाच्या गावी मालुबाई नावाची सासुरवाशीण घरी राहत होती. महादू गवळीच्या कुटुंबात राहत असलेली मालुबाई मुलबाळ नसल्याने सासू व नणंदेच्या जाचातूनही नित्यनियाने पूजा अर्ध्या करीत असे .एके दिवशी दारात आलेल्या साधूने तिला शिवोपासनेचा मंत्र दिला . त्यानंतर दिवसभराच्या कामातून वेळ नसल्याने ती रात्री बारानंतर वालुकामय लिंग बनवून महादेवाची पूजा करू लागली. बारा वर्षानंतर शंकर भगवान तिला प्रसन्न झाले व तू सौराष्ट्रात येऊन पूजा कर असे तिला स्वप्नात सांगितले मात्र मी संसारी स्त्री आहे मला ते शक्य होणार नाही मग सौराष्ट्रातील महादेवांनी तिला मध्यरात्री सौराष्ट्रात येण्यास विमान पाठिवले व दररोज मध्यरात्री ती सौराष्ट्रात जाऊन पूजा करून परत येऊ लागली.
मात्र एके दिवशी तिच्या पतीला तिच्या शिलाचाच संशय आला त्याने तिला पाठलाग केला व विमानाला पकडून ती कोठे जाते हे पाहण्यासाठी तो सौराष्ट्रात गेला. तिच्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले तिचा महादू गायब झाल्याची चर्च्या सुरु झाली व माळुनेच त्याला गायब केलं असा आळ तिच्यावर घेतला गेला .मग महादेवांनी तिच्या स्वनात जाऊन तू सौराष्ट्रात येण्याची गरज नाही मी तुला सर्परूपाने गायीच्या कासेला पिताना दिसेल त्यावेळी तू माझे दर्शन कर असे सांगितले मात्र मालू हे स्वप्न विसरल्याने खोमणे नावाच्या गुराख्याला सर्प दिसला त्याने कुऱहाडीचा घाव घातला.मालूच्या हे लक्षात आले तिने महादेवाची माफी मागितली त्यानंतर महादेवांनी मी लिंगरूपात प्रकट होईल असे स्वप्नात सांगितले, इकडे महादू गवळी परत न आलयाने मालूला जाळण्याची तयारी झाली .मात्र तिने आपले स्वप्न सांगून अखेरची इच्छा म्हणून त्या ठिकाणी खोदणाया सुरवात केली तर तिथेपाण्याची धार लागली व वालुकामय लिंग हि सापडले दरम्यान महादू गवळी पण परत आला व ती सौराष्ट्रात पूजा करणेस गेली होती याबाबत प्रचिती झाली मालू त्याच ठिकाणी गुप्त झाली.म्हणून मंदिरात जाताना प्रथम मालुबाई चे दर्शन घेतले जाते. तसेच जिथे पाण्याची धार निघाली ती विहीर तीर्थाची विहीर म्हणून समजली जाते आजही तेथे खरे खोटे ची शपथ घेतली जाते व खोटे बोलण्याराला चाणाक्ष दिला जातो.तर दर श्रावणात तिसऱ्या सोमवारी निघणाऱ्या पालखी मध्ये कुऱ्हाडीचा वार कारण्याऱ्याला खोमण्याला पहिले सोमनाथाचे दर्शन झालं म्हणून त्याला दर्शनाचा मान पहिला दिला जातो .दर महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात तेथे मोठी यात्रा भरते व श्रावण महिन्यात तेथे सर्परूपी महादेव भाविकांना दर्शन देतात.अशी आख्यायिका आहे.



