Type Here to Get Search Results !

बारामती तालुक्यात आणखी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह..एकूण रुग्ण संख्या १५४ वर



बारामती प्रतिनिधी

काल बारामती मध्ये एकूण ९६ जणांचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले होते. त्यापैकी ८३ जणांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी १३ नमुन्यांचा अहवाल अजुन प्रतीक्षेत आहे. प्राप्त झालेल्या अहवाला पैकी.एकूण ६ नमुने पिजिटिव्ह आले आहेत. त्या मध्ये बारामती शहरातील ४ तर बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील एक युवक व पारवडी येथील एक पुरुष असे ग्रामीण भागातील दोन आहेत. असा एकूण ६ जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे. व ७७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे बारामती मधील एकूण रुग्ण संख्या १५४ इतकी झालेली आहे. बारामती शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रुई येथील २ जणांचा व तांबे नगर येथील १ जण व जाधव वस्ती फलटण रोड बारामती येथील १ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तसेच रात्री माळेगाव येथील पूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला पुणे येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे.बारामती मघील मृतांची संख्या २५ झाली आहे तसेच उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या ७३ झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test