Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर मध्ये गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली: पण नियमांचे पालन करत


सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

अवघ्या महाराष्ट्राचा आनंदाचा उत्साहाचा गणेश उत्सव हा सण असतो त्यामुळे दि २२ऑगस्ट रोजी श्रीगणेशाचे आगमन घरोघरी होणार आसल्याने सोमेश्वरनगर परिसरात मुख्य बाजारपेठ गणेश मूर्ती विक्रेत्यांमुळे फुललेली दिसत होती पण करोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स चे पालंन करत,

  मूर्ती खरेदी करण्यासठी परसातील वाघळवाडी, करंजेपूल,करंजे, मगरवाडी, देऊलवाडी, रासकरमळा, चौधरीवाडी, करंजे पूल सोमेश्वरनगर ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे गणेश मूर्ती घेण्यासाठी गर्दी केली केली होती ,दरवर्षीपेक्षा यावर्षी मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलचे प्रमाण कमी होते , सेक्स सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी नसल्यामुळे ५ ते १० फुटाचे गणेश मूर्तींचे स्टॉल यावर्षी बाजारात नव्हते . आणि मंडळांचे असणारे ढोल-ताशांचा आवाजही बाजारपेठांमध्ये हरवला होता.
परंतु कुटुंबात सदस्य गणेश मूर्ती घेण्यासाठी मात्र बाजारपेठ मध्ये दिसत होते आणि त्यांच्या पाठीमागे लागून आलेली त्यांची चिमुरडे मुलेही ही दिसून येत होती श्री गणेश मूर्ती घेत असताना काही चिमुरडे मुले

"बाप्पा आलेला कोरोनाचा आजार दूरकर  अश्या   बोबड्या आवाजातील वाक्य मात्र कानावर येत होते"...

    या मूर्त्यांमध्ये लालबागचाराजा ,दगडूशेठ व विविध आसनावर ती बसलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींची मागणी बाजारपेठेत दिसत आहे .डायमंड मूर्तीचे आकर्षण असल्याने ग्राहकांची ओढ या मूर्ती खरेदी करण्याकडे आहे .
प्रशासनाने दिलेल्या घरगुती गणपतीचे उंची दोन फूट असावे म्हणूनच दोन फुटाच्या खालील मुर्त्या बाजारपेठ मध्ये दिसत आहे.
या सर्व घरगुती श्रीगणेशाच्या मूर्त्या शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत  बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे. सार्वजनिक मोठ्या मंडळांना परवानगी नसल्यामुळे चार फूट घरगुती दोन फूट उंच मूर्ती विक्रीला असून यावर्षी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार   असल्याची खंतही सुरज कुंभार  या मूर्तीकार यांनी सांगितले आहे .

 फोटो ओळ :सोमेश्वरनगर (ता: बारामती) येथे श्रीगणेशाची  मूर्ती खरेदीसाठी परीवारसोबत चिमुरडा ओजस .

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test