Type Here to Get Search Results !

राजवर्धन पाटील यांनी स्वतः च्या गाडीची अॅब्युलन्स बनून अपघातग्रस्ताचे वाचविले प्राण.

 इंदापूर प्रतिनिधी 

नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील आपल्या नियोजित लग्न भेटीसाठी इंदापूरहुन भिगवणला येत असताना काळेवाडी या ठिकाणी होंडा सिटी आणि दुचाकी यांचा अपघात झालेला पाहीला. पाटील यांनी तत्परतेने गाडी ऊभी करून अॅब्युलन्सला फोन लावला , पण अॅब्युलन्स येण्यास उशीर लागेल , हे समजताच त्यांनी वेळ न दवडता दोन्ही अपघातग्रस्तास आपल्या स्वत:च्या गाडीत भिगवण येथील थोरात हाॅस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले. त्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे दोन्हींही व्यक्तींचे प्राण वाचले. 

चौकट -

यावेळी उपस्थित डाॅक्टरांनी सांगितले की , सदर व्यक्तीस
पायाला व डोक्याला गंभीर जखम झाली असल्याने रक्त जावून अशक्तपणा आला आहे . अॅब्युलन्सची वाट बघत बसल्यास उशीर झाला असता व दुर्दैवी घटना घडू शकली असती . यामुळे त्यांनी राजवर्धन पाटील यांचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test