Type Here to Get Search Results !

व्याख्यानात मांडलेले विचार लॉकडाऊन च्या काळात कृतीत आणले, खर्चाला फाटा देऊन तेरा विवाह उरकले.

वडगाव निंबाळकर प्रतिनिधी

लग्नासाठी होणारा मोठा खर्च टाळून याचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी करा हा विचार पणदरे ता बारामती येथील ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी वेळोवेळी व्याख्यानांतून मांडले. लॉकडाउनच्या काळात नातेवाईक आणि मित्र परिवाराशी फोन वरून सतत संपर्क होत असे. सामाजिक कार्याची आवड असल्याने लग्न जमविण्यासाठी कोकरे सरांनी मध्यस्थी करावी अशी अपेक्षा अनेकांनी बाळगली. यावर आता घर बसल्या आपले व्याख्यानतील विचार कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे. असे समजून कोकरे यांनी मध्यस्थीची भूमिका सुरू केली. पण एका अटीवर... ठरलेले लग्न मोठे न करता साध्या पद्धतीने करायचे यामध्ये पौरोहित्याचे कामही कोकरे करीत राहिले. कोरोना चा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत परिसरातील तेरा लग्न उरकले आहेत. एक विवाह कन्या पाहण्यासाठी गेले अन् अक्षता टाकून घेऊनच आले. लॉक डाऊन च्या काळात कोकरे सरांचा हा फंडा परिसरात आता कौतुकाचा विषय ठरला आहे.

  याबाबत कोकरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, "समाजाला उपदेशाचे डोस पुरवणारे अनेक आहेत. प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार जमेल तसे सत्कर्म करायला सुरुवात केली की समाज घडायला वेळ लागणार नाही. लॉक डाऊन च्या काळात घर बसल्या माझे विचार कृतीत आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. याला लोकांचा प्रतिसाद मिळाला. लग्नाच्या खर्चातून वाचलेले पैसे उभयतांचे संसार पुरवण्याच्या कामी येतील  याचा मला आनंद वाटतो.भविष्यात ही  सामाजिक चळवळ वाढीस लागावी".

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test