बारामती प्रतिनिधी:
बारामती शहरांमध्ये आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई येथील दोन,जामदार रोड येथील २, सूर्य नगरी येथील दोन, तावरे बंगल्याशेजारी ४ , इंदापूर रोड येथील २,रुई येथील दोन, श्रीराम नगर येथील दोन, तसेच महावीर भवन येथील एक, सातव वस्ती येथील एक, कसबा येथील एक, गिरिराज हॉस्पिटल येथील एक, खंडोबानगर येथील एक, खत्री पार्क येथील एक, राम गल्ली येथील एक, भिगवन रोड येथील एक, हरिकृपानगर येथील एक, तांबे नगर येथील एक, पाटस रोड येथील एक, सिद्धांत नगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे तसेच बारामती तालुक्यातील जळगाव कप येथील एक,उंडवडी येथील एक, पणदरे येथील दोन,अंजनगाव येथील एक, निरावागज येथील एक, पिंपळी येथील एक, माळेगाव बुद्रुक येथील एक, सोनवडी सुपे येथील एक, शिवनगर येथील एक व गुणवडी येथील एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.