Type Here to Get Search Results !

आता सोमेश्वर दर्शन भाविकांसाठी ऑनलाईन ..अध्यक्ष विनोद भांडवलकर


श्रावण महिन्यातील दि ३ रोजी असणारा दुसरा सोमवार आहे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच देऊळ बंद असल्या कारणाने सोमेश्वर करंजे तालुका बारामती हेही मंदिर बंद आहे . वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या सुचनेनुसार मंदिर व मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त असून देवस्थान ट्रस्ट यांच्यामार्फत तेही कोणीही दर्शनासाठी येऊ नये असे सूचना करण्यात आले होत्या.
     पंचक्रोशीतील भाविकांचा दर्शनाचा मोह काही सुटत नसल्याचे सोमेश्वर मंदिर करंजे या ठिकाणी  परिसरातील नागरिक महिलावर्ग हे कळस दर्शनासाठी का होईना येत होते .. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर व कोरोना संसर्ग च्या महामारी असल्याने  शिवदर्शन  होत नसल्यामुळे  शिवभक्तांनी  खंत व्यक्त केली आहे. 
 दर वर्षी श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी हजारोच्या संख्येत शिवभक्त दर्शन घेत असतात परंतु यावर्षी चित्र मात्र वेगळे आहे.. परिसरात सर्वत्र फक्त पोलीस बंदोबस्त व शांतता आहे..
 सोमेश्वर देवस्थान ट्रस्टने शिवभक्तांच्या असणाऱ्या सोमेश्वर दर्शनाची ओढ  लक्षात घेता  भाविकांना शिव दर्शन व्हावे म्हणून  ऑनलाइन सिस्टीमचा वापर करत सोमेश्वर देवस्थान ट्रस्टने
लाईव्ह दर्शनाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घराबाहेर न पडता आपल्या मोबाईल रोज  https://somehswardevsthan.000webhostapp.com/    या संकेतस्थळावर भेट देऊन घरातच सोमेश्वराचे दर्शन घ्यावी असे ट्रस्ट अध्यक्ष विनोद भांडवलकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test