सोमेश्वरनगर प्रतिनिधी
दर वर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात येणारी कृष्णजन्माष्टमी निमित्त अन्नदानाचा कार्यक्रम सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसरात करण्यात येत असतो , परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमी कृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमेश्वरनगर परिसरातील नागरिक शिवभक्तांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने मास्क व फळे वाटप आणि शासन नियमाप्रमाणे व सोशल डिस्टंसिंग पालन करत साजरी करण्यात आली.
याप्रसंगी श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे ,जालिंदर शेंडकर, यादवराव शिंदे, सोमनाथ देशमुख , माऊली बोकील , पोपटराव चौधरी , संतोष शेंडकर ,प्रकाश सुतार , संदिप शेंडकर , रवींद्र पवार इत्यादी मान्यवर उपस्थित असून गेले दहा वर्षे हे मान्यवर कृष्ण जन्माष्टमी आनंदात साजरी करत असतात.