सोमेश्वरनगर प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून पावरहाऊस ८०० क्यू सेस पाणी पातळी - पाऊस वाढल्यास नीरा नदीला पाणी .....
पुरंदर तालुक्यातील वीर धरण ९५ टक्के भरल्याने पावरहाऊसला ८०० क्यूसेस ने पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी निरा नदी काठच्या गावांना
जलसंपदा विभागाच्या वतीने निरा नदीला पाणी सोडण्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र धारणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने निरा नदीला पाणी सोडण्यात आले नाही. पावसाचा जोर वाढला तर येत्या दोन दिवसात निरा नदीला पाणी सोडण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाच्या
वतीने सांगण्यात आले आहे.