बारामती प्रतिनिधी
बारामती मध्ये एकूण ६५ नमुने खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले होते. त्यामध्ये बारामती शहरातील ५ व ग्रामीण भागातील चार असे एकूण बारामती तालुक्यातील नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरांमधील फलटण रोड येथील तीन जण तसेच अशोकनगर येथील एक जण, देसाई इस्टेटमधील एक रुग्ण तसेच मेडद येथील तीन जण व खताळपट्टा ढेकळवाडी येथील एक जणांचा समावेश आहे.त्यामुळे बारामती मध्ये आज एकूण २१ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून बारामतीची रुग्ण संख्या ३४७ झालीआहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिले आहे