पुणे येथील राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या अंकिता पाटील यांनी भेट घेतली.
यावेळी अंकिता पाटील यांनी सांगितले की, सदैव जनसेवेसाठी तत्पर, प्रशासनाचा व राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव, या वयात देखील एक वेगळी ऊर्जा त्यांच्या बोलण्यातून व संकल्पनेतून जाणवत होती.
तरूणांनी विशेषतः युवतींनी राजकारणात सक्रीय होवून जनसेवा व समाजसेवा करावी यासाठी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आग्रही असून त्यांच्या भेटीमुळे पुढील कार्य करण्यास एक नवीन ऊर्जा व प्रोत्साहन मिळाले असल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले .