बारामती प्रतिनिधी
दि. १५ ऑगस्ट २०२० या ७४वा भारतीय स्वातंत्र्यदिन चे औचित्य साधून समाज्यातील गुणवंत विद्यार्थी व समाजातील महत्त्वाची कामगिरी बजावणारे काही पोलीस कर्मचारी जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी सतत झटणारे असे कोविड योद्धा यांचाही सन्मान करत, कुलवंतवाणी धर्मशाळा ट्रस्ट, शिक्षण समिती (मांगल्य) यांनी गेली १६ वर्षे राबवत असलेला शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनानिमित्त समाज्यातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शनिवार दि १५ ऑगस्ट रोजी सकाळी ज्येष्ठ समाज बांधव दत्तात्रय गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
श्रावण महिन्याचे औचित्य साधत ट्रस्ट मार्फत शुभांगी विनोद शेटे (विश्वस्त) यांच्या हस्ते सकाळी श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली.तसेच सरस्वती पूजन करून "१७ वा शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ" सुरू करण्यात आला. सदर पुरस्कार मध्ये १०वी आणि १२वी मधील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा दरम्यान ट्रस्ट मार्फत घेण्यात येणारे विविध उपक्रम यांची माहिती देण्यात आली.
कुलवंतवाणी धर्मशाळा ट्रस्ट (मांगल्य) च्या वतीने सलग तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अतिशय सुनियोजित पणे "गौरी गणपती सजावट स्पर्धा" याचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या "गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२०" याबद्दलची सर्व माहिती ही विश्वस्त मंगेश नगरे यांनी समाज बांधवांस दिली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय गुजर साहेब आणि श्री. विश्वास नगरे साहेब यांनी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थी यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले आणि त्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत या सर्वांना ट्रस्ट तर्फे सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम फक्त गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
उर्वरित सर्व समाज बांधव यांनी सदर कार्यक्रमास फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थी यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभ-आशीर्वाद दिले तसेच या निर्णयाबद्दल ट्रस्टचे कौतुक देखील केले.
त्याचप्रमाणे कुलवंतवाणी समाज बंधू-भगिनींनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला निश्चितच मनोबल वाढविणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणार असून यापुढेही आपला स्नेह असेच वाढत राहो ही अपेक्षा सचिव स्वप्निल मोटे यांनी व्यक्त केली.
सर्व समाज बांधवांचे पाठबळ आणि आशिर्वाद असेच आम्हांस मिळत राहो हीच श्री संत तुकाराम महाराज यांच्या चरणी प्रार्थना अशी इच्छा ही अध्यक्ष प्रवीण कडेकर, स्वप्निल मोटे आणि विश्वस्त मंडळ यांनी व्यक्त करून सदर कार्यक्रम याची सांगता करण्यात आली.