सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बुधवार दि.५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे पायाभरणी कार्यक्रम होत आहे. त्या अनुषंगाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, साहित्य, चिताफीत किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या अफवा, खोट्या बातम्या सोशल मिडिया वर व्हायरल करू नये. अन्यथा संबंधित व्यक्तीसह ग्रुप एडमीनवर भा द वि कलम नुसार व महाराष्ट्र पोलीस कायद्या नुसार गुन्हे दाखल केले जातील.
तसेच ग्रुप एडमीनने आत्ताच सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात, तसेच ग्रुप सेटिंग बदलून फक्त एडमीन मेसेज पाठवेल अशी व्यवस्था करावी.
अशी माहिती बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या आदेशानुसार वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.



