सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल-सोमेश्वरनगर येथे दर मंगळवारी आठवडे बाजार असतो , काही व्यापारी-शेतकरी मतीमोल भावात काही पालेभाज्या न विकता तिथेच सोडून देतात दुसऱ्याच दिवशी त्या तळावर आरामशीर एक दिवस मेंढपालांच्या शेळ्या मेंढ्याचा एक दिवसाचा चऱ्याचा प्रश्न मार्गी लागत असतो .सर्वत्रच सध्या पाऊस रोजच हजेरी लावत असून इतरत्र हिरवा चारा चांगलाच उगवला असला तरी शेळ्या मेंढ्या घेऊन भटकंती न करता आठवड्यातुन एक दिवस बाजारतलावर जात असतो.
मंगळवारी असलेल्या आठवडे बाजारात कोबी, फ्लावर, टोमॅटो, तांदुळसाला बाजारभाव नसल्या ते बाजारतलावर मोठ्या प्रमानात फेकून दिले आहे त्याचा फायदा काही मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या चाऱ्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याठिकाणी येत असतात त्यामुळे आठवड्यातून एक दिवस का होईना माझ्या मेंढ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा मिळतो याचे समाधानही ते व्यक्त करतात.



