Type Here to Get Search Results !

कुलवंतवाणी समाज ट्रस्ट आयोजित कलाविष्कार मेहंदी ऑनलाईन प्रदर्शन- ५४४ कलाप्रेमींचा सहभाग..

बारामती प्रतिनिधी विनोद गोलांडे

कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या वतीने दि.१,२ व ३ ऑगस्ट २०२० रोजी कलाविष्कार मेहंदी ऑनलाईन प्रदर्शनाचे आयोजन आपल्यातील सुप्त कलागुणांचा वापर आत्मनिर्भरतेसाठी करण्याच्या उद्देशाने करण्यात आले.

         या अंतर्गत कलाप्रेमी यांना सदर प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी दि.२२ जुलै ते २६ जुलै  असा एकूण ५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.या कालावधी मध्ये कलाप्रेमी यांनी अतिशय सुंदर,मनमोहक,
विलोभनीय,कलात्मक मेहंदी 
ऑनलाईन सादर केल्या.सदर प्रदर्शनामध्ये मध्ये पाच दिवसात अभूतपूर्व व उत्स्फूर्तपणे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांच्या विविध भागातून तसेच यू.एस.ए.(U.S.A.) या देशातून एकूण "५४४" कलप्रेमींनी ऑनलाईन सहभाग घेतला

       सहभागी कलाप्रेमी यांच्या मेहंदीचे ऑनलाईन प्रदर्शन विविध गटानुसार दि.१,२ व ३ ऑगस्ट या दिवशी फेसबुक,व्हाट्सएप या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले.

         सहभागी कलाप्रेमी यांची स्वतंत्र यादी व्हाट्सएप ग्रुप व फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध करून सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच सदर प्रदर्शनातील सर्व सहभागी कलप्रेमींना आकर्षक ऑनलाइन डिजिटल सहभाग प्रमाणपत्र ट्रस्टच्या वतीने  देण्यात आले.

          सदर उपक्रमाचे समाजात प्रथमच आयोजन करण्यात आले असून याचे संपूर्ण नियोजन कुलवंत वाणी समाजातील महिलांनी केले होते.या उपक्रमात बहुसंख्य समाजबांधव व भगिनी यांनी सहभाग नोंदवला.या उपक्रमाचे आयोजन नागपंचमी व रक्षाबंधन या उत्सवाच्या कालावधीत केल्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला.यामुळे उपक्रमाबाबत समाजात सर्वत्र स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे.

       अशी माहिती कुलवंत वाणी समाज ट्रस्टचे समन्वयक श्री.रविंद्र गोलांडे सर,श्री.प्रियेश तोडकर व श्री.मंदार वासकर यांनी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test