इंदापूर तालुक्यातील अगोती हे गाव हरित करण्यासाठी सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे यांच्या संकल्पनेनुसार इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून तब्बल १००० वृक्षांच्या लागवडीचा प्रारंभ झाला असल्याने , पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे . त्यामुळे आगामी काळात हेच गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल असा आशावाद इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी व्यक्त केला .
अगोती गावामध्ये १००० वृक्ष लागवडीचा प्रारंभ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते , पत्रकार संघाचे मुख्य सागर शिंदे , इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार , यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की , गावाचे खऱ्या अर्थाने वैभव वृक्ष व रस्ते असून यामध्ये वृक्ष लागवड करण्याची संकल्पना , ग्रामीण भागात निर्माण
होण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे . गावातील नागरिकांना स्वच्छ व सुंदर हवा , वातावरण या झाडांच्या माध्यमातून मिळण्यासाठी मदत होणार आहे . शासनाच्या माध्यमातून या गावाला पाहिजे ती विकास कामासाठी मदत केली जाईल अशीही ग्वाही गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली .
यावेळी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते , मुख्य सचिव सागर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले . तंटामुक्ती अध्यक्ष रामदास घनवट , सामजिक कार्यकर्ते लक्ष्मण गुणवरे , सरपंच मोनाली दळवी , उपसरपंच सुनील शिंदे , ग्रामसेवक बालाजी निलेवाड , पोलीस पाटील रेश्मा गुणवरे , मुख्याध्यापक बालाजी कलवले , गावकरी ग्रामपंचायत सदस्य कौशल्य गुणवरे , सामजिक कार्यकर्ते विनोद दळवी , नंदकुमार भोसले , सुखदेव गुणवरे , दिलीप गुणवरे आदी उपस्थित होते .
तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान विजयकुमार परीट व पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी प्रज्ञा घोरपडे , क्षितीजा भोसले , ओंकार घोरपडे , सृष्टी विजयकुमार परीट यांना सन्मानित करण्यात आले . पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ , शिवाजी पवार , निखिल कणसे , भीमसेन उबाळे , प्रेस फोटोग्राफर राजेंद्र भोसले व आदी मान्यवर उपस्थित होते .