Type Here to Get Search Results !

वडगांव निंबाळकर परिसरात ढगफुटीने दिडशे हुन अधिक घर गेली पाण्यात..


वडगाव निंबाळकर प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील बुधवारी रात्री वडगाव निंबाळकरच्या  परिसरात  जोरदार पावसाने हजेरी लावली असल्याने गाव हद्दीतील  ओढ्याला इतर भागातून पाणी ओढ्या पात्राला पाणी मिळत असल्याने त्याला नदीचे रूप आले होते आलेल्या पुराच्या भितीने नागरिकांना रात्र  जागरण करतच काढावी लागली ; वडगाव निंबाळकर  परिसरात काल दि ९ रात्री ढगफुटी झालेल्या चा  पाऊस झाला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले.. या मुसळधार पावसाने परिसरातील ओढ्यानाल्याला पूर आला आणि ओढ्यालगतच्या सुमारे १५० घरामध्ये पुराचे पाणी शिरले, पूरस्थिती निर्माण परिसरातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.. 


वडगाव परिसरातील वाकी, चोपडज, होळ, कोऱ्हाळे या गावामध्ये कालरात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तलावात आलेले पावसाचे पाणी सांडव्यातून ओढ्यात आले. ओढापात्र पूर्णक्षमतेने वाहू लागले. वाकी चोपडज येथील लगतच्या घरांमधून पाणी शिरले. वडगाव निंबाळकर परिसरात पाण्याचा प्रवाह मोठा झाल्यामुळे पाण्याचा वेग वाढला, परिणामी ओढ्याला नदीचे स्वरूप आले. बाजार तळावरील सर्व ओठे पाण्याखाली गेले. दरम्यान प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची संरक्षण भिंत, व्यायाम शाळेची संरक्षक भिंत तीव्र प्रवाहामुळे पडली. इतर काही ठिकाणी भिंत कोसळण्याचे प्रकार घडले. सुमारे १५० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. ओढ्यानाल्यांना पूर आल्याने गावातील रस्त्यांवर पाणी आले होते. गावातील बाजारतळ, पांढरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेला आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. काही भागात काही काळासाठी तर काही भागात रात्रीपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रात्रीच्या वेळी हा सर्व प्रकार घडल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम केले. पहाटे सुमारास प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, पाटबंधारे अभियंता प्रविण घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, मंडलअधिकारी संजय माने, तलाठी रविंद्र कदम, माजी सरपंच सुनील ढोले, निलेश मदने, नानासो मदने यांनी ओढापात्राची वाकी तलावापर्यंत जाऊन संपूर्ण पाहणी केली. सध्या परिसरात अजूनही हवामान ढगाळ असल्याने एकंदर पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test