माळेगाव प्रतिनिधी....
जनता कर्फ्युचे उल्लंघन करणा-या दुचाकी,चारचाकी व माल वहातूक करणा-या वहानांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला असून दोन दिवसांत अडिचशे जणांवर कारवाई करत पन्नास हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिली.
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता बारामती शहर व तालुक्यात सर्वच ठिकाणी प्रशासनाने जनता कर्फ्यु जाहिर केला. मात्र या जनता कर्फ्युस काही जणांनी हरताळ पासल्याचे दिसुन येते.
सांगवी ता.बारामती येथील जिल्हा सिमा बंदोबस्त व माळेगाव येथे मास्क न वापरणे,प्रदुषण प्रमाणपत्र नसणे,वाहन परवाना नसणे,क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणे,विनाकारण दुचाकी फिरवणा-यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी सुमारे अडिचशे जणांविरुद्ध कारवाई करत पन्नास हजार रुपये वसूल करण्यात आले.
सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आबा ताकवणे,नाईक रमेश नागटिळक पोलीस काॅन्टेबल नितिन चव्हाण,अमोल खांडेकर,निखील जाधव व होमगार्ड पथकाने केली.
********************************************
नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन करावे.अत्यावश्यक काम असेल तर बाहेर पडावे. पोलीसांची कमतरता असल्याने जनता कर्फ्युचे उल्लंघन होऊ नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या दहा जणांच्या विशेष पथकास पाचारण करण्यात आले आहे.
.....सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे....



