सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील दुपारी झालेल्या पावसाने करंजे येथील वढ्याला पाणी पुलावरून वाहू लागल्याने करंजेपुल आणि करंजे गावचा संपर्क तीन तास तुटला , यामुळे मात्र काही जाणारे व येणाऱ्यांचे मात्र हाल झाले , तसेच सोमेश्वरनगर येथील करंजेपुल ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे येथे चौधरवाडी , करंजे,शेंडकरवाडी , वाकी ,चोपडज तसेच लोणी-भापकर या गावांवरून नागरिक येथे येत असतात.
झालेल्या पावसामुळे नागरिकांचे मात्र चांगलेच हाल झाले आहे ,
असे असले तरी काही करंजे गावातील युवक येणार्या जाणार्या प्रवाशांची मदत करताना मात्र दिसून येत होते ...यावरून आपणाला असे जणवते की सामाजिक बांधिलकी जपणारे काही करंजेतील युवकांचीअसणारी तत्परता व काळजी दिसून येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसो हुंबरे यांनी सांगितले.



