Type Here to Get Search Results !

"बैल-पोळा"सण पहिल्यांदाच घरगुती साजरा : लक्ष्मण ठोंबरे

 बळीराजाची पूजा करताना कुटुंबासमवेत लक्ष्मण ठोंबर.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात येणाऱ्या सोरटेवाडी, करंजे,माळवाडी, मगरवाडी, होळ, वाघळवाडी , सस्तेवाडी या गावांमध्ये दरवर्षी असणारा बैल पोळा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो त्यांची बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. कोरोनाच्या संसर्गामुळे या वर्ष्यातील  अनेक सण उत्सव आपल्याला  कमी लोकांत मर्यादा पाळूनच साजरे करावे लागले आहेत. 

युवा पिढीचा सणाला उस्फुर्त सणाला प्रतिसाद

सोशल डिस्टन्सिंग राखूनच कोरोनापासून दूर राहू शकतो. 
त्यामुळे बैलपोळा सणाला मोठ्या प्रमाणात एकत्र येणं टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तसेच वडगांव पोलीस ठण्यातर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये  आव्हाहन यांनी केले होते.असे असताना  बारामती  तालुक्यातील गरगुती का होईना शेतकऱ्यांचा  मित्र असणाऱ्या    बळीराजाचा सण शेतकऱ्यांनी चागला च प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे.
 चिमुकल्यांनी ही बळीराजाला घेतला सजवण्याचा आनंद
 
तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात सस्तेवाडी या गावामध्ये असणाऱ्या ग्रामदैवत भैरवनाथ मरीमता व  मारुती मंदिर परिसरात  दरवर्षी बैलपोळ्याला बैलजोड्यांची संख्या व मोठी गर्दी होत असते.  तसेच हा सोहळा पाहण्यासाठी  परिसरातील वाड्या वस्त्यांवरील कुटुंबासहित लोक येत असतात आणि सोहळ्याचा आनंद घेत असतात मुळता या सोहळ्याची सुरुवात पारंपरिक, वाद्य ,हलगी गुलालाची उधळण करत या गावांमध्ये होत असते . 

******************************************

परंतु यंदा हा परिसर बैला बिना सुना दिसत होता. शेतकरी फक्त नारळ फोडण्यासाठी गावातील असणाऱ्या ग्रामदैवत यांना परिसरात आलेले दिसत होते. कोरोना विषाणु संसर्गाचे सावट तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता या सणावर स्पष्टपणे जाणवत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test