इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती आज रविवारी (दि.१३) जेष्ठ नेते , माजी संसद सदस्य , कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व मान्यवरांनी भावपुर्ण आदरांजली अर्पण केली . कर्मयोगी शंकरराव पाटील यांचा आज १४ वा स्मृती दिन आहे . याप्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील , अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते .



