Type Here to Get Search Results !

कुतवळवाडी वि.का.सहकारी संस्थाच्या चेअरमन पदी ॲड.भरत बोरकर यांची निवड बिनविरोध.

मोरगाव प्रतिनिधी
कुतवळवाडी ता. बारमती येथील कुतवळवाडी   विविध .कार्यकारी सेवा  सहकारी संस्थाच्या   चेअरमन पदासाठी  निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यावेळी ॲड.भरत सोपान बोरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने  बिनविरोध निवड करण्यात आली . 


येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पद निवडीचा निवडणूक  कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. संस्थेचे एकूण सभासद ७९१ आहेत .नुकत्याच झालेल्या चेअरमन पद निवडीसाठी भरत सोपान बोरकर यांचा एकमेव अर्ज आला असल्याने त्यांची बिनविरोध निवस करण्यात आली .  यावेळी  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए .एस.महारनवर यांनी काम पाहीले.


 यावेळी श्री.बापु चोरमले,बाळासो कुतवळ,शंकर बोरकर, जालिंदर कुतवळ इ.संचालक व बोरकरवाडी- कुतवळवाडीचे पोलीस पाटील राहुल बोरकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.निवडीनंतर  बोलताना ॲड.बोरकर  यांनी सांगितले की , संस्थेची स्वमालकीच्या जागेत इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test