इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
भाटघर धरणातून सोडण्यात आलेल्या गेल्या काही महिन्यांपासून पाण्यामुळे शेटफळ हवेली येथील ब्रिटिशकालीन तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
परंतु तलावाच्या आऊटलेटच्या दुरूस्तीचे काम न झाल्याने तलावाच्या इतर बाजूंनी पाणी मोठ्या प्रमाणात भराव्यास भगदाड पडून गळती होत असल्यामुळे तलावास धोका निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे शेटफळ हवेली, सुरवड येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. याची माहिती मिळताच निरा- भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी तलावाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी उपसरपंच सचिन शिंदे, संजय शिंदे, श्रीयश नलवडे, आकाश कांबळे, अमित निंबाळकर, विलास शिंदे, माऊली चव्हाण, नितीन शिंदे, विजय शिंदे, गणेश देवकर, केशव शिंदे आदी उपस्थित होते. मागील दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन शिंदे यांनी स्थळाची पाहणी करून, गंभीर स्थिती असल्याचे मत व्यक्त केले होते. शिंदे यांनी कार्यकारी अभियंता धोडपकर यांना कल्पना दिल्यानंतर दुरूस्तीचे काम ही सुरू झाले.
युवा नेते राजवर्धन पाटील यांनी शेटफळ हवेली येथील आपल्या समर्थकांसह तलावावर व गळतीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कामाची व परिस्थितीची पाहणी केली. गळतीचे प्रमाणही थोडे कमी झाले असे निदर्शनास आले.
संबंधित अधिकारी यांस काम चांगले दर्जाचे करून हा विषय काळजीपूर्वक हाताळण्यास सांगितले.



