बारामती प्रतिनिधी
सध्या जगात कोरोना या महामारीशी सर्वच लढत असताना महाराष्ट्रातील माता भगिनी मायक्रो फायनान्स च्या जुलमी वसुलीला तोंड देत आहेत . केंद्र सरकारने उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले . तसेच आमच्या माता भगिनींनी मायक्रो फायनान्स चे घेतलेले लोन माफ व्हावे व जोपर्यंत लोन माफ होत नाही तोपर्यंत वसुली थांबविण्यात यावी म्हणून बहुजन मुक्ती पार्टी ने बुधवारी दि २३ रोजी राज्यव्यापी आंदोलन केले .
वडगांव निंबाळकर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना करंजेपुल दुरक्षेत्र येथे निवेदन देण्यात आले .
यावेळी बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष संतोष भिसे ,उपाध्यक्ष भाऊसो हुंबरे , दीपक दणाने , विकास शेंडगे , बंटी गायकवाड , सचिन पाटोळे तसेच महिला
रेश्मा दणाने , विद्या भिसे , संगीता खोमणे , छाया सोनवणे , जयश्री साखरे , रेखा कांबळे , स्वाती गायकवाड उपस्थित होते .



