Type Here to Get Search Results !

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" सर्वेक्षणाचा फायदा : डॉ मनोज खोमणे


बारामती प्रतिनिधी

बारामती शहर तालुक्यात लागू करण्यात आलेल्या जनता कयूं व 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'
सर्वेक्षणाचा फायदा बारामतीकरांना झाला आहे. सात दिवसात करोनाचा आलेख कमी होत आहे. ही बाब बारामतीकरांसाठी दिलासादायक आहे. शहर व
तालुक्यात प्रादुर्भाव वाढल्यानंतर शहरात जनता कफ्यूं लागू करण्यात आला. १४ दिवसांत करोनाची साखळी तुटण्यास मदत झाली. सर्वेक्षणात संक्रमित रुग्णांचे
विलगीकरण केल्याने पुढील संसर्ग टळला. याचे परिणाम लॉकडाऊन हटविल्यानंतर दिसून आले. सात दिवसांपासून बारामतीतील पूर्ण संक्रमित रुग्णांची संख्या काहीअंशी कमी होताना दिसत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे म्हणाले की, जनता कयूं तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणामुळे कोरोनाची साखळी तुटन्यास मदत झाली आहे. त्यामुळे मागील आठवड्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. इथून पुढील काळात देखील नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. शासनाने दिलेल्या नियमांचेेेे नागरिकांकडू पालन झाल्यास  पुढील परिस्थितीही  बदलण्यास मदत होईल 
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test