Type Here to Get Search Results !

आमदार कुल यांची तालुक्यातील प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा

दौंड प्रतिनिधी राहुल आवचर

दौंड चे आमदार राहुल कुल यांनी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेत तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करीत काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये गेले ६ महिने रेल्वे सेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे व कामानिमित्त दौंड - पुणे हा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून  रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर, अत्यावश्यक सेवेतील , शासकीय, निमशासकीय सेवेतील इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना देखील दौंड-पुणे प्रवासासाठी परवानगी देण्यात यावी हि मागणी केली , यापूर्वीही  हि मागणी तत्कालीन  जिल्हाधीकारी नवल किशोर राम यांना देखील भेटून केली होती परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही याची माहिती दिली. तसेच दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत आहे तेव्हा महसूल विभागाने कार्यवाही करून अवैध वाळू उपशाला लगाम घालावा या मागण्या करण्यात आल्या असून यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test