बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परीसरात काल दि ६ रोजी जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने परीसरातील शेकडो हेक्टर उसाचे नुकसान झाले आहे . याचे पंचनामे नोंद करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिमजिरायत भागातील , उंबर वाडा ,मुर्टी , आंबी , जोगवडी , चौधरवाडी भापकर मळा ,देऊलवाडी, थोपटेवाडी ,वाकी, चोपडज परीसरात काल दि ६ रोजी सायंकाळी ७ ते रात्रभर मुसळधार पाऊस पडला.पाऊस सुरु असतानाच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या परीसरातील ऊस , कांदा , मका, भूईमुग , बाजरी या शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे .यामुळे शेतकऱ्यांचा हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला आहे .
तालुक्या सह सोमेश्वरनगर परीसरात मुर्टी , चौधरवाडी भापकर मळा आंबी ,जोगवडी, लोणी भापकर ,को-हाळे, थोपटेवाडी , आदी परीसरात गेल्यावर्षी लागण झालेला आडसाली , पुर्व हंगामी तसेच खोडवा , निडवा ऊस १६७४ हेक्टर जमीनीवर आहे .तर यंदा लागण झालेला आडसाली ऊस ७०४ हेक्टर जमीनीवर आहे .
पडलेल्या अवकाळी पाऊस , गारा , सोसाट्याचा वारा यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . सोमेश्वर सहकारी कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या परिसरात गत वर्षी चंगल्या प्रमाणात पावसामुळे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला होता.त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक हातातोंडाशी आलेले उभे पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे
आडसाली व यंदा लागण झालेल्या ऊसाचे वारा व गारांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . ऊसाबरोबरोच बाजरी भूईमुगही जमीनदोस्त झाली आहे .
चौकट....
सोमेश्वरनगर च्या जिरायत परीसरात ऊसा व इतर पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दखल घेऊन पंचनामे नोंद करण्याचे आदेश द्यावेत. बाधीतांना नुकसान भरपाई द्यावी .
ऊस शेतकरी
प्रगतशील शेतकरी तानाजी भापकर चौधरवाडी...
*******************************************
उभे असणारे बाजरी पीक याची थोड्याच दिवसात काढणी होणार असून मिळालेल्या धान्यातून समाधानी होणार होतो परंतु अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसल्याने ते आता जमीनदोस्त झाल्याने हाताशी आलेल्या बाजरी पिकाकडे बगताना डोळ्यातून पाणी थांबत नव्हते.
बाजरी शेतकरी
जिरायत शेतकरी रामचंद्र वाघ, थोपटेवाडी...