Type Here to Get Search Results !

राज्यमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांचेकडून वालचंदनगर परीसरातील लाळगे व वाणी कुटुंबीयांचे सांत्वन


इंदापूर तालुका प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

        वालचंदनगर परीसरातील गणेश लाळगे या तरुणाचे अपघाती दुर्दैवी निधन झाल्याने राज्यमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी लाळगे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले . यावेळी वालचंदनगर बाजारपेठेतील वाणी कुटुंबातील कोरोनाच्या आजाराने कै.अशोक वाणी व कै.विष्णु वाणी या सख्ख्या दोन्ही भावांचे निधन झाल्याने वाणी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने वालचंदनगर बाजारपेठेमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना , त्याच कुटुंबातील गणेश वाणी हे कोरोनाच्या संकटावर मात करून आल्याने वाणी कुटुंबाला एकमेव आधार राहिला असल्याने नामदार भरणे मामा यांनी वालचंदनगर बाजारपेठेतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून वाणी कुटुंबीयांतील सदस्यांना आधार दिला .

      यावेळी नामदार दत्तात्रय  भरणे यांच्यासमवेत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप पाटील , माजी पंचायत समिती सदस्य  सुहास डोंबाळे , माजी युवक अध्यक्ष सचिन सपकळ , वालचंदनगरचे माजी सरपंच राजू भाटीया , विजय खरात , वालचंदनगर ग्रामपंचायत सदस्य  विजय कांबळे, शहराध्यक्ष अमर निंबाळकर , कळंब सोसायटीचे माजी चेअरमन संजय खरात आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test