सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी या परिसरामध्ये शेतकऱ्यांना " कृषीकन्यां" नि शेतातील पीकांसंदर्भात रोगराई व इतर माहिती प्रशिक्षण देत त्यांचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना करून दाखवली .
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय लोणी येथे शिक्षण घेत असलेल्या व अंतिम वर्षात शिकणारी ऋतुजा होळकर या विद्यार्थिनीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना शेती विषयक विविध विषयांतर्गत प्रात्यक्षिके करून दाखवली , यामध्ये तिने खतांचा कसा वापर करावा , पिकांवरील कीड व असणाऱ्या रोगांवर नियंत्रण , चारा उपचार , माती परीक्षण अश्या विविध विषयांवर माहिती देत प्रात्यक्षिके दाखवत असताना दीपक होळकर, नंदा होळकर , कृष्णा कारंडे , शुभम कारंडे ,यश होळकर शेतकरी कुटुंब उपस्थित होते
तिने घेतली .
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी शिक्षक संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस , प्रा निलेश दळे , कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक रमेश जाधव , डॉ.निलेश दळे , डॉ.दिपाली तांबे , अधिकारी अमोल खडके तसेच इतर प्राध्यापक वर्गांचे मार्गदर्शन मला लाभल्याने शेतकऱ्यांना उत्कृष्ट रित्या माहिती देता आली व शेतकऱ्यांनीही दिलेल्या शेतीविषयक माहितीबद्दल कृषिकन्याचे आभार मानले पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.



