इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यात कळंब परिसरात रविवारी ( दि. ६ सप्टेंबर ) रोजी संध्याकाळी ९ ते १०.३० पर्यंत मुसळधार पाऊस पडल्याने मल्हारनगर मधील रहिवासी दत्तात्रय लक्ष्मण बामणे यांचे घराचा समोरील दरवाजा, खिडकीसह संपूर्ण भिंत कोसळली आहे.
बामणे यांच्या घराची भिंत बाहेरील बाजूस कोसळल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. बामणे कुटुंबियांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शासकीय स्तरावरून मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.