Type Here to Get Search Results !

तरडोलीचा पाझर तलाव लागला वाहू : शेतकरी समाधानी

बारामती प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील पाच गावांना पाणीपुरवठा करणारा तरडोली  येथील पाझर तलाव आज सलग दुसऱ्या वर्षी  पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरुन पाणी वाहू लागले  आहे. तलाव भरल्याने रब्बीतील पिकं हमखास झाली असल्याने  परीसरातील शेतकरी आनंदीत आहे.

 तरडोली ता . बारामती येथील पाझर तलाव पाट्बंधारे विभागाकडून १९७२ साली बांधण्यात आला.  याची  पाणी साठवणुक क्षमता सुमारे ८८ दशलक्ष घनफुट आहे . या तलावावर तरडोली , मासाळवाडी  येथील  जमीनी शेत  सिंचनासाठी अवलंबून आहे . तर  तलावाकाठी असणाऱ्या विहरीवर तरडोली , मासाळ्वाडी , बाबुर्डी , माळवाडी , व मोरगांव( काही भाग )  या गावच्या  पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी योजना  अवलंबून आहे. तलावात    तब्बल  बारा वर्षापेक्षा अधीक काळ पाणी नसल्याने   या योजना  पाण्या अभावी धुळ्खात पडल्या होत्या .

पावसाच्या दृभीक्षामुळे  तब्बल १२ वर्षे तलाव कोरड्या अवस्थेत होता . गेल्या महीन्यात २६ सप्टेंबर  २०१९ रोजी पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पोटचाऱ्या मार्फत सोडण्यात आलेले पाणी व पावसामुळे  पुर्ण क्षमतेने भरला होता . तसेच याही वर्षी काल दि. ६ रोजी पावसाची  संततधार व नाझरे धरणातुन पोटचाऱ्याद्वारे सोडलेले पाणी यामुळे तलाव पुर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरुन पाणी वाहण्यास सुरवात झाली .सलग दोन वर्षे हा तलाव भरला आहे .

 वरील गावांच्या पाण्याच्या योजना बंद झाल्यामुळे ग्रामपंचायतीस  मोरगांव प्रादेशिक  नळ योजनेचे पाणी घ्यावे लागत असल्याने पाणी  पट्टीवर ग्रामपंचायतींचा खर्च होत होता . मात्र तरडोलीचा पाझर  पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे  याही वर्षी विहीर नळ योजना सुरु राहणार आहेत.

.................................................................
तरडोली येथील पाझर तलाव भरल्यानंतर लोणी भापकर  ,माळवाडी जळगाव  , तरडोली  , मोरगांव येथील विहरींची पाणी पातळी वाढते असे  जेष्ठ जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे . यामुळे परीसरातील  बागायत क्षेत्र यंदाही वाढण्यास मदत होणार आहे .

..................................................................

 तरडोली येथील पाझर तलावामधुन गाळ   बारामती यांच्यावतीने सण २०१२  - १३ साली एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती या संस्थेने काढल्यामुळे तलावाची पाणी साठवून क्षमता वाढली आहे . यावेळी काढलेल्या गाळ अनेक शेतकऱ्यांनी शेतात टाकल्यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे .पाणी साठवण क्षमतामुळे शेतकऱ्यांकडुन समाधान व्यक्त होत आहे .



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test