का-हाटी प्रतिनिधी
वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यातील काऱ्हाटी, जळगाव, कोळोली, माळवाडी, पानसरे वाडी, काळखैरेवाडी, सुपे परिसरातील शिवारातील पिके भुईसपाट झाले आहेत. रविवार दि.७ सायंकाळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अवघ्या दोन तासात ८७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा कहर दोन तास सुरू होता. यामध्ये बाजरी, मका, ऊस, कडवळ आदी पिके भुईसपाट झाली. भाजीपाला डाळिंब फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
वादळी वारे व पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.