दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सिलेट केमिकल कंपनीत आज पहाटे अचानक आग लागल्याने केमिकल बॉलर च्या स्फोट होऊन आगीचे मोठे लोट तयार झाले त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सिलेट केमिकल कंपनीमध्ये इतर कंपन्यांचे प्रक्रियेतून शिल्लक राहिले केमिकल वेगवेगळे करण्यात येते पण यात आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी औद्योगिक वसाहतीचा व परिसरातील इतर कंपन्यांचे अग्निशामक बंब प्रयत्न करण्यात आले.



