दौंड तालुक्याच्या पूर्व भागात मागील काही दिवसांपासून शिरापूर येथे अवैधरित्या वाळू उपसा यांत्रिक बोटीच्या साह्याने चालू होता , त्या वाळू उपशावर आज महसूल विभाग कडून कारवाई करण्यात आली असून यामध्ये 13 यंत्रिक बोटी उध्वस्त करण्यात आल्या आहेत ,यामुळे येथील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून महसूल विभागाचे आभार मानण्यात आले यापुढे ही अशीच कारवाई चालू राहणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे काल दौंड चे आमदार राहुल कुल हे जिल्हा अधिकारी यांना भेटल्यानंतर आज या अवैधरित्या चालू असलेल्या वाळू उपसा वर कारवाई करण्यात आली आहे , ही कारवाई दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार सचिन आखाडे मंडल अधिकारी अजित मोहिते सुनील जाधव विजय खरतोडे आदीमहसूल कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
महसूल विभागाच्या कारवाईमुळे शेतकरीवर्ग समाधानी
September 30, 2020
0
दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
Tags



