Type Here to Get Search Results !

”कर्मयोगी कारखान्याचा ३१ वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न”


इंदापूर प्रतिनिधी  शहाजीराजे भोसले 

(दि. २५ सप्टेंबर) – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२० - २१ चा ३१ वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज विधीवत पुजेसह कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन उत्साहात संपन्न झाला . महाराष्ट्र  राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन हर्षवर्धनजी पाटीलसो , व्हाईस चेअरमन श्रीमती पद्माताई भोसले व सर्व संचालक मंडळ यांचे शुभहस्ते संपन्न झाला . बॉयलर अग्निप्रदिपन समारंभानिमित्त आयोजित श्री. सत्यनारायण महापुजा सुभाष बलभिम काळे , संचालक व सविता सुभाष काळे या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाली . 
या गळीत हंगामातील कारखान्याच्या मशिनरी ओव्हरहॉलिंगची सर्व कामे पूर्ण होत आली असून ऊस तोडणी यंञणा सज्ज करणेचे काम सुरु आहे . यावर्षी कारखान्यास १४ लाख मे.टन कार्यक्षेञातील नोंद बिगरनोंद तसेच कार्यक्षेञाबाहेरील २ लाख असा एकूण १६ लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे . गाळप हंगामाकरिता कारखान्याने ५७५ ट्रक/टॅक्टर करार करुन ऍ़डव्हान्स वाटप केलेले आहे व ७०० बैलगाडी तसेच ४५० टॅक्टरगाडी करार केलेले आहेत . तोडणी प्रोग्रॅम कॉम्प्युटराईज्ड करणेत येत असल्याने ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येणार नाही .
यावर्षी आपले कार्यक्षेञामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे . उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे , त्यामुळे कारखान्यास ऊसाची उपलब्धता मुबलक आहे . यावेळी कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक सभासद , कारखान्याचे वाहतुकदार , तोडणी मुकादम व सर्व कामगारांचे सहकार्याने येणारा हा गळीत हंगाम यशस्वी करणेचा मानस व्यक्त केला . 
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक भरत शहा , भास्कर गुरगुडे , विष्णू मोरे , हनुमंत जाधव , मच्छिंद्र अभंग , अंकुश काळे , सुभाष काळे , प्रशांत सुर्यवंशी , यशवंत वाघ , मानसिंग जगताप , राजेंद्र गायकवाड ,  राहूल जाधव , अंबादास शिंगाडे ,  वसंत मोहोळकर , केशव दुर्गे ,  अतुल व्यवहारे ,  राजेंद्र चोरमले ,  पांडुरंग गलांडे , सुभाष भोसले , जयश्री नलवडे , कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार , व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test