Type Here to Get Search Results !

दोन अल्पवयीन मुलीस पळवून त्यांच्यावर बलात्कार करणा-या आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.....


सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

बुधवार २३ ऑगस्ट ला  सतीश सुरेश मोरे रा.साखरवाडी ता.फलटण याने करंजेपुल-सोमेश्वरनगर येथील बुद्धविहार येथून दोन अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून मोटर सायकल वरून पळवून घेवून गेलेला होता... यातील एका मुलीस सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात तर फलटण तालुक्यात लपवून ठेवले होते... यातील एका अल्पवयीन मुलीस बुधवारी २६ ऑगस्ट  रोजी संध्याकाळी सोडून दिले तर दुसरे मुलीवर शुक्रवार ४ सप्टेंबर  पर्यत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी जबरी संभोग केला.... तो आरोपी आतापर्यंत फरारी होता.... गुरुवार दि.२४ सप्टेंबर रोजी रात्री उशीराने आरोपी सतीश सुरेश मोरे हा साखरवाडी(ता फलटण) येथे आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे यांना मिळाल्यानंतर त्यांनी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर  , वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचे मार्गदर्शनाने...साखरवाडी जात येथील केळीच्या व ऊसाच्या शेतात पाठलाग करून पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंडे व कर्मचारी साळुंखे  तसेच होमगार्ड यांनी आरोपीस पकडून बेड्या ठोकल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test