Type Here to Get Search Results !

रेडडेसिव्हिर व टाॅसिलिझुमॅब औषधांचा तुटवडा नाही डाॅ.राजेश देशमुख : कृत्रिम टंचाई निर्माण करणारेवर कठोर कारवाई


इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह संपूर्ण राज्यात कोरोना रूग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसिव्हिर व टाॅसिलिझुमॅब औषधांचा तुटवडा असून, काळाबाजार सुरू झाला आहे. यामुळे सर्वसामान्य रूग्णांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी रेमडेसिव्हिर व टाॅसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी, पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. ज्या औषध वितरकांकडे हि औषधे उपलब्ध आहेत, त्यांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. औषध वितरणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा गंभीर इशारा जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिला आहे. तसेच या औषधांच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी थेट अन्न व  औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर देण्यात यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test