Type Here to Get Search Results !

काऱ्हाटी परिसरात पावसाचे थैमान.

काऱ्हाटी प्रतिनिधी बाळासाहेब वाबळे

काऱ्हाटी आणि परिसरात पावसाचे थैमान. सुपे व परिसरातील गावांमध्ये दोन दिवसाच्या दोन टप्प्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातल्याने ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून ताली फुटल्या आहेत. आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास पहिला पाऊस सुरु झाला आणि तो अडीच वाजता थांबला पुन्हा साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसास सुरुवात झाली आणि पाच वाजून वीस मिनिटाने पाऊस बंद झाला या दोन टप्प्यातील मुसळधार पावसाने काऱ्हाटी गावाच्या गाव ओढ्याला पूर आला होता. तर  उशिरा पेरणी केलेल्या बाजरीची कणसे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी टाकलेली कांद्याची रोपे सडण्याची शक्यता असून आगाप पेरलेल्या व लावलेल्या कांद्याची रोपे पिवळी पडून रोग पडण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजी व कोथिंबीर, टोमॅटो या तरकारी पिकांचेही नुकसान झाले आहे.काऱ्हाटी ,सुपे व परिसरातील नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, बाबुर्डी, वढाणे, काळखैरेवाडी, राजबाग, पानसरेवाडी या भागांमध्ये सर्वदूर पाऊस झाला आहे. या भागामध्ये गेल्या महिन्यापासून सतत पाऊस होत असून यामुळे शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने बाजरी ,मका या पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये अनेकांची ऊस पिके आडवी पडून नुकसान झाले आहे.  नाझरे धरणातून पाणी सोडण्यात आलेेने नदीपात्रातून ही पाणी जास्त वाहू लागल्याने नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test