मोरगाव प्रतिनिधी
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित मोरगाव व सुपा पोलिस चौकी क्षेत्रात आज विना मास्क फिरणाऱ्या ६० नागरिकांवर कारवाई करून रू.१२ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच १८८ प्रमाणे ६ इसमावर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. सदरचे कार्यवाही मध्ये पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे कर्मचारी धेंडे, जैनक, पिसाळ व होमगार्ड यांनी सहभाग घेतला आहे.पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी घाबरून न जाता नियम पाळा, मास्क वापरा, गरम दुध हळद टाकून घ्या, गरम पाण्याची वाफ नाकावाटे घ्या, इतर लोकांपासून ठराविक अंतर दूर थांबा, वेळोवेळी आपले हात साबनाने स्वच्छ करा असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक सुभाष मुंढे यांनी केले आहे.
तालुक्यात २० सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यु वाढवला असून यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे.



