Type Here to Get Search Results !

सोमेश्वरचा ५९ व व्या गळीत हंगाम सन २०२०-२१ चा बाॅयलर अग्निप्रदिपन संपन्न


सोमेश्वर नगर प्रतिनिधी 

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना  ५९ व व्या गळीत हंगाम सन २०२०-२१ चा बाॅयलर अग्निप्रदिपन  समारंभ कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी रोहिणी जगताप यांच्या  शुभहस्ते रविवारी ( दि.४ ) उत्साही वातावरणात संपन्न झाला .
 चालू गळीत हंगाम कारखाना कार्यक्षेत्रात ३३ हजार ३०० एकरावर तुटू न  येणाऱ्या उसाची नोंद आहे , कारखाना चालू हंगामात १२ लाख मे.  टन गाळप  करणार आहे. ऊसतोड मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्याने कारखाना प्रथमच १२ हार्वेस्टर यंत्राद्वारे ऊस तोडणी करण्यास प्राधान्य देणार आहे. 
राज्य शासनाने १५ ऑक्‍टोबरपासून गळीत हंगामास परवानगी दिली आहे, त्यानुसार कारखाना हंगामास तयार असल्याचे जगताप  म्हणाले 
    याप्रसंगी राष्ट्रवादी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर ,  उपाध्यक्ष शैलेश रासकर  , कार्यकारी संचालक राजेंद्र यादव , संचालक नामदेवराव शिंगटे , सिद्धार्थ गीते , सुनील भगत , विशाल गायकवाड ,  लालासाहेब माळशिकरे , किशोर भोसले,  महेश काकडे , हिराबाई वायाळ,अशा मोजकेच संचालक , अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते . तसेच कोविड संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्स चे काटेकोर पणे पालन करण्यात आले.

 सोमेश्वर कारखाना प्रथमच १२ हर्वेस्टर च्या मशिनद्वारे ऊस तोडणी प्राधान्य देणार आहे, सर्वांच्या सहकार्याने हा हंगाम यशस्वी पार पाडु असा विश्वास अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला. २९४ ट्रक- ट्रॅक्टर, ९००  बैलगाडी , १५० डम्पिंग यांच्याशी वाहतूक करार पूर्ण झाले आहेत. कारखाना अंतर्गत सर्व कामे पूर्ण झाले असून कारखाना यंत्रणा तयार आहे.
सोमेश्‍वर कारखान्याच्या अतिरिक्त प्रश्न निर्माण झाल्याने विस्तारीकरण निर्णय घेतला असल्याने सोमेश्वर सहकारी कारखाना ऑक्‍टोबर २०२१ पर्यंत ७९ कोटी ३७ लाख रुपये खर्चून कारखान्याचे विस्तारीकरण करणार आहे असे जगताप म्हणाले याचा फायदा सोमेश्वर सभासदांना होणार असून  तीन ते चार लाख मे.टन गाळप क्षमता वाढणार आहे.
................................................................
विस्तारीकरण करताना कोणतीही यंत्रणा बंद न करता विस्तारीकरण करण्याचे काम केले जाणार आहे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार
..............................................................
सोमेश्वर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ८६०३२ या व्हरायटी चा ऊस कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त करावा असेही आव्हान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test