Type Here to Get Search Results !

तरुणांनी आरोग्यदायी रहाने गरजेचे ; कार्यालय परिसर झाला शोभेवंत : अध्यक्ष पोपट हुंबरे

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बहुजन समाज सेवा संघ व ग्रामपंचायत करंजे यांचा वतीने (  सोमवार दि ५ रोजी )वृक्षरोपण व जिम व्यायाम साहित्य  उदघाटन करंजे सरपंच जया संताजी गायकवाड,  माजी सैनिक पत्नी हिराबाई दादू हुंबरे  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 
   या प्रसंगी उपसरपंच राजश्री गायकवाड, आजी माजी सैनिकसंघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर , नितीन शेंडकर व बहुजण समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पोपट  हुंबरे , भाऊसो हुंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड , ग्रामसेवक काळभोर साहेब, पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे , शिवसेना विभाग प्रमुख बंटी गायकवाड  ग्रामस्थ  तसेच बहुजन समाज सेवा  संघचे सदस्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
बोलतां अध्यक्ष हुंबरे म्हणाले की आपले गाव व परिसर सुशोभित व्हावा या अनुषंगाने  प्रथम गाव ग्रामपंचायत पासून कार्य सुरू केले असून कार्यालय परिसरात शोभेची फुलझाडे संघा मार्फत लावली आहे.

गावातील तरुणांनी आरोग्य ची काळजी घ्यावी म्हणून जिम साहित्यचे नियोजन करून त्याचा उपयोग तरुणाईने करावा व आपले आरोग्य सदृढ ठेवावे अशी संकल्पना मणी ठेवत हुंबरे यांनी सामाजिक कामाची सुरुवात करंजे येथे केली व यापुढे अशीच सामाजिक कामे सर्व ग्रामस्थ मान्यवरांना सोबत घेत करण्याची संकल्पना या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली.

त्यामुळे त्यांचे व त्याच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test