बारामती प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने दसऱ्या पुर्वी अंतिम उस दर किमान ३५००/- रू.
प्रती मे.टन जाहिर करून उर्वरित ६००/- रू. प्रती मे.टन कोणतीही कपात न करता सभासदांच्या बँक
खात्यावर एकरक्कमी वर्ग करावी. यासाठी सोमेश्वर कारखान्यास शेतकरी कृती समितीच्या वतीने दि.
१५/१०/२०२० रोजी निवेदन देण्यात आलेले आहे. श्री सोमेश्वर कारखान्याचे सन २०१९-२० या
हंगामाचे गाळप ९,३४,७८४, रिकव्हरी ११.८६, साखर पोती ११,०८.९५० ऐवढी झाली व जिल्ह्यात
एक नंबरचा कमांक मिळवला आहे असे कारखाना म्हणतो. कारखान्यावर मागील संचालकांच्या चुकीच्या
धोरणांमुळे सुमारे २६८ कोटी रूपये कर्ज करून ठेवले होते व त्याची शिक्षा मात्र सभासदांना देवुन
त्यांच्या उस बिलातुन व्याजासह वसुल करून कारखाना कर्ज मुक्त केला व चेअरमन यांनी स्वतःची पाठ
थोपटुन घेतली व त्याची फ्लेक्सबाजी करून जेवणावळी देखील घातल्या त्याही सभासदांच्या पैशातुनच
झाल्या. तसेच चेअरमन यांनी दि.२७/९/२०२० रोजी सकाळ वर्तमान पत्रामधुन मुरूमच्या सभेत चांगला
दर देवु असे सांगीतल्याने बहुतांश सभासदांनी अब की बार ३५००/- पार दर द्यावा अशी मागणी
केली की जी योग्यच होती ते निश्चित चुकीचे नव्हते. परंतु त्यावर आजपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला
स्वलिशाही
दिसत नाही. चेअरमन यांनी बॉयलर प्रतिपादन कार्यक्रमात कारखान्याचे लवकरच विस्तारीकरण करण्याच्या
दृष्टीने बऱ्याचशा मंजुऱ्या घेतल्या असुन सदर प्रकरण डी.पी.आर सहीत साखर आयुक्तांकडे मंजुरीसाठी
पाठविले आहे असे वक्तव्य केले. परंतु सन २०१९-२० च्या अंतिम उस बिला संदर्भात जाणीव पुर्वक
एक शब्द ही बोलले नाहीत. म्हणुन कृती समितीला वरील मागणी संचालक मंडळाकडे करावी लागत
आहे. दसरा व दिपावली जवळ आलेली असल्याने सर्व सभासद अंतिम उस बिलाची वाट पाहत आहेत.
व तशी मागणीही कृती समितीने करावी असे बऱ्याचशा सभासदांनी व्यक्तीश: भेटुन व फोन करून
सांगितले आहे. दिपावलीनंतर शाळा सुरू होतील त्याची फी, पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या मशागती,
उसाची बांधणी, बी-बियाणे खरेदी व लग्न सराई अशा अनेक गोष्टींना सभासदांना सामोरे जावे लागणार
असल्याने त्यांना पैशांची आवश्यकता आहे. तसेच कोरोना महामारीमुळे सगळीकडेच संकट उभे राहिले
असल्यामुळे आज लोकांच्याकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजार भावही मिळत नाही
त्यामुळे शेती धंदा कोलमडुन पडला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाया
गेली आहेत. त्यामुळे कारखान्याने अंतिम उस बील ६००/- रू. प्रती मे.टन सभासदांच्या बँक खात्यावर
दसऱ्या दरम्यान वर्ग करावे.
तसेच कारखान्याने मागील वर्षीच्या साखर विकी दरापेक्षा या वर्षांची साखर विकी चढ्या भावाने
केलेली आहे, उपपदार्थांचे उत्पादन देखील मागील वर्षी पेक्षा जादा झालेले आहे व विकी ही जादा झाली
आहे. तसेच विज विक्री सुध्दा चांगली झालेली आहे. कारखान्याने मागील वर्षी ३३००/- रू. प्रती मे,
टन अंतिम भाव दिलेला आहे. त्यामुळे मागील वर्षांपेक्षा हंगाम सन २०१९-२० मध्ये जास्त उत्पन्न
असताना ३५००/- रू. प्रती मे.टन उस दर देण्यास कारखान्यास काहीही अडचण नाही. तसेच
कारखान्याने सभासदांच्या उस बिलातुन उस दर देण्यासाठी किमत चढउतार निधी २० कोटी रूपये कपात
केलेले आहेत (की जे कायद्याने फक्त उस दर देण्यासाठीच वापरावे लागतात) ते पैसे देखील
कारखान्याला उस दर देण्यासाठी वापरावे किंवा वापरता येतील. त्याचप्रमाणे कारखान्याकडे सभासदांच्या
परतीच्या व बिनपरतीच्या ठेवीं वरील व्याज सालाबाद प्रमाणे देण्यात यावे व काही मुदत संपलेल्या ठेवी
असल्यास त्या ही दसऱ्या दरम्यान सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग कराव्यात. त्यामुळे कारखान्याच्या
संचालक मंडळाने किमान ३५००/- रू. प्रती मे.टनांच्या वर उस दर जाहिर करून उर्वरित ६००/- रू.
प्रती मे.टन सभासदांच्या बँक खात्यावर एकरक्कमी वर्ग करावे. त्या पेक्षा जादा भाव दिल्यास त्यांचे कृती
समिती अभिनंदन व स्वागतच करेल,
तरी कोरोना महामारीमध्ये सभासदांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम कारखान्याचे असल्याने हंगाम
२०१८-१९ पेक्षा २०१९-२० मध्ये कारखान्याची रिकव्हरी जरी कमी असली तरी २० कोटी रूपयांचा
किंमत चढउतार निधी, कारखान्याच्या साखर विकीस चढ्याभावाने मिळालेला दर व उपपदार्थांचे जादा
उत्पन्न व विकी, चांगली झालेली विज विकी यातुन किमान ३५००/- रू, प्रती मे.टन उस दर जाहिर
काहीही अडचण नाही. तरी उर्वरित उस बिलाची ६००/- रू. प्रती मे.टन रक्कम कोणतीही कपात न
करता एकरक्कमी दसऱ्या दरम्यान सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी. वरील मांडलेली सर्व
आकडेवारी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने मी जबाबदारीने मांडलेली आहे याची
कृपया चेअरमन व संचालक मंडळ यांनी नोंद घ्यावी. त्यामुळे उर्वरित ६००/- रू. प्रती मे.टन रक्कम
कोणतीही कपात न करता एकरक्कमी, तसेच कारखान्याकडे सभासदांच्या परतीच्या व बिनपरतीच्या ठेवीं
वरील व्याज व काही मुदत संपलेल्या ठेवी असल्यास त्या ही सभासदांना दसऱ्या दरम्यान अदा करण्यात
याव्यात. असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने सोमेश्वर कारखान्यास करण्यात येत आहे. तसेच
बॉयलर प्रतिपादन कार्यक्रमात चेअरमन यांनी विस्तारीकरण करणार असल्याबाबत जे वक्तव्य केले
त्याबाबतची भुमिका शेतकरी कृती समिती लवकरच वर्तमान पत्राव्दारे मांडणारच आहे.