दुष्काळी भागात सलग दुसऱ्यांदा कऱ्हेचा रुद्रावतार. बुधवार (दि.१४) रात्री ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे काऱ्हाटी परिसरासह सुपे परगणा काळखैरेवाडी, बाबुर्डी ,पानसरे वाडी, देऊळगाव, कोरोळी,नारोळी, फोंडवाडा, जळगाव, भिलारवाडी, सायंबाचीवाडी, लोणी भापकर आदी परिसरात पावसाने थैमान घातले. तर नझरे धरणातून १५००० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. नदीपात्रात पाणी वाढल्याने जळगाव परिसरातील लोकवस्तीत पाणी घुसले त्यामुळे प्राथमिक शाळा परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. शेरेवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी, फोंडवाडा, जळगाव, अंजनगाव, कऱ्हावागज याठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बनल्याने बंधाऱ्यावर पाणी प्रवाहाबरोबर झाडे-झुडपे वाहत आल्याने अडकून बसले आहेत. काऱ्हाटी येथील कऱ्हा नदी वरील स्मशानभूमी शेजारी बैठक पुलावरून साडेचार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. तसेच स्मशानभूमीमध्ये सर्वत्र पाणी पसरली आहे. जाधव वस्ती, बाबुर्डी ,पवार वस्ती, पानसरे वाडी, सुपा आदी गावांचा संपर्क तुटला आहे.
दुष्काळी भागात सलग दुसऱ्यांदा कऱ्हेचा रुद्रावतार.
October 15, 2020
0
Tags