Type Here to Get Search Results !

पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे

पुरंदर प्रतिनिधी

पुरंदर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी निवडणूक बिनविरोध 
अध्यक्षपदी दै प्रभातचे राहुल दिनकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका पत्रकार संघाची आज द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. 
१८ ऑक्टोबर २०२० ते १७ ऑक्टोबर २०२२  या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी प्रत्येकी एक असे नऊच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल भांडवलकर यांनी जाहीर केले, यासाठी सतीश सांगळे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले,नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे
 अध्यक्ष राहुल दिनकर शिंदे
, उपाध्यक्ष किशोर तुकाराम कुदळे
 सरचिटणीस अमोल अरविंद बनकर
 कोषाध्यक्ष निलेश प्रकाश भुजबळ
जिल्हा प्रतिनिधी पदी राजेंद्र ज्ञानोंबा शिंदे
तालुका समन्वयक प्रवीण सोपान नवले
सह सरचिटणीस पदी  स्वप्नील अशोक गायकवाड
 तर कार्यकारिणी सदस्यपदी 
योगेश साहेबराव कामथे
विशाल हनुमंत फडतरे
निखिल सतीश जगताप
चंद्रकांत विष्णु चौंडकर
 यांची बिनविरोध निवड झाली. 
नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे ,  विभागीय सचिव बापूसाहेब गोरे , पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी  अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test